कोणी तरी आपल्यावर भरभरून प्रेम करावं
आपण त्याचा प्रेमाच्या छायेत विसावं...त्याने सतत जवळ रहावं
फक्त माझाकडेच पहावं...
दोघांनी कुठेतरी दूर जावं
हातात हात धरून फक्त चालत रहावं...
त्याने माझी खडी काढावी आणि मी रुसावं
मग त्याने माझी समजूत काढून मला मानवाव...
दोघांनी पावसात चिंब भिजावं
थंडी वाजल्यावर त्याने मला मिठीत घट्ट धरावं...
क्षितिजावर सूर्य मावळत असताना
एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचा वाचन द्यावं....
मन असं सुंदर स्वप्नं बघतं
काय करणार हे वयच असं असतं!!!!!