Thursday, October 7, 2010

मुलगी म्हणून

जन्माला आले मुलगी म्हणून
कधी हट्ट नाही केला 
कधी उलटून नाही बोलले 
नेहमी धाक बाळगला......मुलगी म्हणून 

सारं ऐकून घेतलं 
न केलेल्या कृत्यांचे आरोप सहन केले.....मुलगी म्हणून 

स्वतःच्या पायावर उभी राहिले 
घर आणि दार सांभाळले 
कुणाचं मन नाही दुखावलं
सगळ्यांना समजावून घेतलं.....मुलगी म्हणून

पण कधी कुणी माझा विचार केला? 
कधी मला समजून घेतलं?
कधी माझा भावना समजून घेतल्या?
का मी असंच मन मारत जगायचं......मुलगी म्हणून?